ऐन दसऱ्यात शेतकऱ्यांवर आला शिमगा; परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अरबी समुद्रात परतीच्या पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून परतीचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. परंतु काही शेतकऱ्यांना मात्र या परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे. निसर्गामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर्षी खूप जास्त पाऊस पडला. त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले, तसेच आत्ता या हंगामात दुसरे संकट आलेले आहे. ते म्हणजे परतीच्या शेतकऱ्याच्या पावसाने हातात आलेले पीक नाहीसे झालेले आहे.

खरीप हंगामातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटाका बसलेला आहे. कारण आता शेतकऱ्याचे सोयाबीन पीक हे 50% पावसात भिजलेले आहे. तसेच कपाशीच्या पिकाला देखील परतीच्या पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. दसरा आणि दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.

गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वीजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील झाला. यामुळे सोयाबीनच्या पिकाला फटका बसलेला आहे. तसेच खरीप हंगामात जवळपास 6, 849 हेक्टर क्षेत्रापैकी 3,523 हेक्टर सोयाबीनची पेरणी झालेली होती. तसेच कपाशीच्या पिकाची देखील लागवड झाली. होती 90% सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहे.

या परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. परंतु अजूनही सरकार किंवा प्रशासn नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेले नाही. याचे फोटो देखील अपलोड केलेले आहेत. शेतकरी चिखल तुडवत नुकसानीचे फोटो काढण्यासाठी जात आहेत. परंतु विम्या कंपन्यांचे सर्वर डाऊन होत आहे. आणि शेतकऱ्यांना मात्र याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. यावर्षी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ आलेली आहे. कारण सोयाबीनच्या एक एकरचा खर्च हा 20,000 एवढा आहे. तर कापसाचा खर्च 16 हजार रुपये आहे. परंतु आता परतीच्या पावसाने सगळ्या पिकाचे नुकसान केलेले आहे. परंतु आता सरकार यावर कोणती भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.