Reunion Island : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ‘या’ बेटाखाली दडलंय विचित्र रहस्य; भयानक हालचालींमुळे वाटते भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reunion Island) आजपर्यंत तुम्ही अनेक रहस्यमयी कथा ऐकल्या असतील. सिनेमे पाहिले असतील, पुस्तके वाचली असतील. पण, जगभरात खरोखर दडलेली रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता काही वेगळीच असते. या संपूर्ण जगात कितीतरी ठिकाणे, वास्तू, वस्तू आणि घटना अशा आहेत ज्या अत्यंत रहस्यमयी आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेताना एक विशेष कुतूहल जाणवते. तर काहींविषयी जाणून घेताना मनात भीती निर्माण होते. अशीच भीती निर्माण करणाऱ्या एका रहस्यमयी बेटाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जे दिसायला अत्यंत सुंदर असले तरी त्याच्या खालील पाण्यात दडलेलं रहस्य मनात विचित्र भीती तयार करत. या बेटाचं नाव आहे ‘रियुनियन बेट’. चला या बेटाविषयी अधिक माहिती घेऊया.

रहस्यमयी ‘रियुनियन बेट’ कुठे आहे? (Reunion Island)

जगभरात अनेक रहस्य दडली आहेत. त्यापैकी एक रहस्य हिंद महासागरातील रियुनियन बेटाखाली दडलं आहे. हे बेट अतिशय सुंदर असून इथल्या नेत्रदीपक दृश्यांमुळे प्रसिद्ध आहे. या बेटाला अतिशय सुंदर निसर्ग लाभलेला आहे. असे असूनही हे बेट अत्यंत धोकादायक मानले जाते. कित्येक जलतरणपटू आणि सर्फरसुद्धा या बेटाखाली पाण्यात जायला घाबरतात. या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. मात्र, या बेटाखाली धोकादायक रहस्य दडलं आहे. ज्याविषयी आपण जाणून घेत आहोत.

काय आहे या बेटाचं धोकादायक रहस्य?

सुंदर, नयनरम्य दृश्ये आणि आकर्षक समुद्रकिनारा लाभलेले रियुनियन बेट संपूर्ण जगभरात धोकादायक बेट म्हणून ओळखले जाते. या बेटाखाली पाण्यात उतरायला कुणीही तयार होत नाही. यामागे एक धोकादायक रहस्य दडलं आहे. (Reunion Island) हिंदी महासागराच्या मध्यभागी वसलेले हे बेट त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असले तरीही इथे जीवाला धोका आहे असे मानले जाते. कारण, हे बेट शार्कने घेरलेले आहे. इतकेच नव्हे तर या बेटावर सक्रिय आणि सुप्त ज्वालामुखी आहे. जिचा कधीही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे इथे जायला लोक घाबरतात.

रियुनियन बेटाचा इतिहास

माहितीनुसार, रियुनियन बेटाचा ज्वालामुखी सक्रिय आहे. ज्याचा १६४० पासून आतापर्यंत शंभरहून अधिक वेळा अचानक उद्रेक झाला आहे. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा यातून प्रचंड काळा धूर निघतो. त्यावेळी निघणार ज्वाला या संपूर्ण बेटावरून दिसतात. याची एकूण किनारपट्टी २०७ किलोमीटर इतकी आहे. (Reunion Island) असे असूनही या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावा विशेष नसल्याचे स्थानिक सांगतात. हा ज्वलंत लावा थेट समुद्रात वाहत असल्याने तो सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. अशा या सक्रिय ज्वालामुखीनेच या बेटाला आकार दिलाय, असेही काही लोक सांगतात.

रियुनियन बेटाची खासियत

रियुनियन बेटाबद्दल आणखी सांगायचे झाले तर, इथल्या सक्रिय ज्वालामुखीच्या लावा प्रवाहाने इथे बरेच बोगदे बनले आहेत. जे या बेटाची खासियत मानले जातात. या बोगद्यांमधून अनपेक्षित आणि नेत्रदीपक प्रवास केल्याने बेटाची भूगर्भीय रहस्ये आपल्या समोर उलगडतात. या बेटाच्या मध्यभागी अनेक लहान मोठी गावे आहेत. जी अत्यंत दुर्गम आहेत. (Reunion Island) इथे बेकरी आणि किराणा दुकानांना हेलिकॉप्टरने पुरवठा केला जातो. या ठिकाणी केवळ पायी किंवा हेलिकॉप्टरने पोहोचता येते. असे सांगितले जाते की, या ठिकाणी राहणारे लोक हे पळालेले गुलाम होते. त्यामुळे त्यांनी हे दुर्गम ठिकाण आश्रय म्हणून वास्तव्यासाठी निवडले.