Wednesday, February 1, 2023

तलाठ्याच्या भावावर वाळू चोरीची कारवाई; 3 लाख 36 हजाराचा दंड

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सध्या माण व खटाव तालुक्यात वाळू चोरी प्रकरणी रविवारी रात्री माण – खटावचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्यावतीने वाळू वाहतूक प्रकरणी नुकतीच कारवाई करण्यात आली. यामध्ये तानाजी अंकुश भोसले, (रा. दिवड, ता. माण) यास ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगणी, ता. माण येथील तलाठी मालोजी अंकुश भोसले यांचा सख्या भाऊ आहे. यावेळी पथकाने चार ब्रास वाळू, ट्र्क ताब्यात घेत तीन लाख छत्तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माण तालुक्यातील म्हसवड – शिंगणापूर रोडवर माळवाडी येथे रविवारी रात्री ट्रकच्या साहाय्याने वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर रात्री महसूल विभागाच्यावतीने त्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यावेळी ट्रक (क्र. एम.एच.42 – 8586) हा अवैध वाळू वाहतूक करत असून ट्रकमध्ये चार ब्रास वाळूची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले. तीन लाख छत्तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यामध्ये तानाजी अंकुश भोसले, (रा. दिवड, ता. माण) यांच्या मालकीचा ट्र्क असून तो जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला ट्रक म्हसवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

माण तालुक्यातील माणगंगा नदीवर ठिकठिकाणी सुरु असलेल्या वाळू उपशावर प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी व तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाकीचे तलाठी संतोष ढोले, वरकुटे – म्हसवडचे पोलीस पाटील अंकुश माने, कोतवाल नितीन मोटे हे सहभागी झाले होते.