Reverse Flowing River – तुम्हाला माहितेय? भारतात उलट्या दिशेने वाहतात ‘या’ नद्या; जाणून वाटेल आश्चर्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reverse Flowing River) आपला भारत देश हा निसर्गाने नटलेला आणि जैवविविधतेने समृद्ध देश आहे. जो गेली अनेक शतके सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहे. भारताला विविध नद्यांचे वरदान आहे. ज्या केवळ भारतभूमीचे पोषण करत नाहीत तर या देशातील लोकांसाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक, अर्थ आणि उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या भूमिका निभावतात. भारतात अनेक नद्यांचा आकर्षक प्रवास सुरू आहे. यातील ३ नद्यांचा प्रवास मात्र इतर नद्यांच्या प्रवाहाकडे पाठ फिरवून सुरु आहे. अर्थात भारतात अशा ३ नद्या आहेत ज्या उलट्या दिशेने वाहतात. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे आणि आज आपण याच नद्यांविषयी माहिती घेणार आहोत.

भारतातून वाहणाऱ्या हजारो नद्यांपैकी २०० हुन अधिक नद्या मध्य प्रदेशातून वाहतात. तर बहुतेक नद्यांचा उगम उत्तर हिमालयात होतो आणि त्यांचा प्रवाह दक्षिणेकडे जातो. तसेच काही नद्या पूर्व हिमालयात उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहतात. (Reverse Flowing River) भारतातील प्रमुख नद्यांमध्ये सिंधू, ब्रह्मपुत्रा, वितस्ता, झेलम, सरस्वती, गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, सरयू, महानदी, कृष्णा, कावेरी आणि गौमती या नद्यांचा समावेश आहे. यांपैकी गंगा ते जमुनापर्यंत कोणत्याही नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांची खळखळ दिसेल. मात्र इतर नद्यांच्या तुलनेत तीन नद्या अशा आहेत ज्या उलट्या दिशेने वाहताना दिसतात.

उलट्या दिशेने वाहणाऱ्या नद्या (Reverse Flowing River)

1) नर्मदा नदी – नर्मदा नदी ही भारतातील गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन मोठ्या राज्यांमधून वाहणारी प्रमुख नदी आहे. जी प्रवाहाच्या बरोबर विरुद्ध दिशेने वाहते. आपल्या भारतातील अनेक नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतात. या नद्या तो पूर्वेला बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. (Reverse Flowing River) मात्र नर्मदा नदी हि या नद्यांच्या अगदी उलट दिशेने म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. हि नदी पश्चिमेकडे अरबी समुद्रात येऊन विलीन होते. नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचे कारण रिफ्ट व्हॅली आहे. रिफ्ट व्हॅलीचा अर्थ असा कि, तिचा उतार हा नदी ज्या दिशेने वाहते त्याच्या विरुद्ध दिशेकडे आहे. यामुळे नर्मदा नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. भारतातील हि एकमेव नदी प्रवाहाच्या उलट वाहते. तर याशिवाय आणखी दोन नद्या आहेत ज्या उलट दिशेने वाहतात

2) तापी नदी – मध्य भारतात बेतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात उगम पावणारी ताप्ती नदी हि एक महत्वाची नदी आहे. हि नदी सातपुडा डोंगर आणि चिखलदरा खोऱ्यांमधून खळखळत वाहते. (Reverse Flowing River) या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातो. पुढे हि नदी खंभातच्या आखातात समुद्राला येऊन मिळते. या नदीच्या प्रवाह मार्गात मध्य प्रदेशातील मुलताई, नेपनगर, बैतूल आणि बुरहानपूर, भुसावळ, नंदुरबार, नाशिक, जलग्राम, धुळे, अमरावती, अकोला, बुलढाणा, महाराष्ट्रातील वसीम आणि गुजरातमधील सुरत आणि सोनगढ या शहरांचा समावेश आहे.

3) चंबळ नदी – चंबळ ही एक बारमाही नदी आहे. जी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ जनपाव डोंगरातून वाहते आणि दक्षिणेकडून विंध्य पर्वतरांगापासून उत्तरात इंदूरजवळ महू शहरात उगम पावते. हि नदी सुरुवातीला उत्तरेकडे आणि नंतर हळूहळू उत्तर- पूर्व दिशेने सुमारे २४९ किलोमीटरपर्यंत राजस्थानमधून वाहते. (Reverse Flowing River)