मुंबई । सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता आणखी एक नवं वळण पाहायला मिळत आहे. एनसीबीच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस स्थानकात सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. रियाने तक्रार केल्यानंतर वांद्रे पोलीसांनी सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बहिणींवर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सुशांतच्या बहिणी आणि एक डॉक्टर तरुण कुमापच्या विरोधात रिया चक्रवर्तीने तक्रार दाखल केल्यानंतर 12 तासांच्या आतच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे पोलिस स्थानकात इंस्पेक्टर प्रमोद कुंभार यांनी सुशांतच्या दोन बहिणी आणि एका डॉक्टरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. डॉ. तरुण कुमार दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात कार्डियोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांच्यावर सुशांतला औषधं दिल्याचा आरोप आहे. या सर्वांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा, सुशांतची दिशाभूल केल्याचा आणि गुन्हेगारी षड्यंत्र रचल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
द हिंदूने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बहिणी आणि डॉक्टर यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीएस) कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेची डिलिव्हरी करणं), कलम 464 (खोटी कागदपत्र तयार करणं), कलम 465, 466, 468, 474, 306 आणि 120बी यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रोपिक सबस्टेंस कायद्यांतर्गत कलम 8(1), 21, 22 आणि 29 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिया चक्रवर्तीने याआधी 7 पानांची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. ज्यामध्ये रिया म्हणाली होती की, सुशांत सिंह राजपूतला बायपोलर डिसऑर्डर असल्याचं समजलं होतं आणि त्याच्यावर इतर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार सुरु होते. रिया तक्रार दाखल करताना म्हणाली होती की, सुशांत योग्य उपचार घेत नव्हता, तो बऱ्याचदा औषधं घेणं बंद करत होता. रियाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ‘सुशांत सिंह राजपूतने आठ जून, 2020 मला त्याच्या फोनमधील काही चॅट्स दाखवले. त्यामध्ये त्याने त्यांची बहिणी प्रियांकासोबत संवाद साधला होता. प्रियांकाने त्याला औषधांची एक लिस्ट पाठवली होती. मी सुशांतला सांगितलं की, जे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते, त्यांनी आधीपासूनचं औषधं दिली होती.’
पुढे रिया म्हणाली की, ‘पण सुशांतला माझं म्हणंण पटलं नाही. आणि त्याने मला सांगितलं की, मी फक्त तिच औषधं घेणार जी माझ्या बहिणी सांगत आहेत.’ त्याचं दिवशी सुशांतने रियाला त्याच्या घरातून जाण्यास सांगितलं . कारण सुशांतची बहिणी मीतू सिंह सुशांतच्या घरी काही दिवस राहण्यासाठी येणार होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ‘ही गोष्ट समोर आली आहे की, सुशांत सिंह राजपूतने आठ जून रोजी आपली बहिणी प्रियांकाला सांगितंलं होतं की, तो डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय डॉक्टरांकडून औषधं घेऊ शकणार नाही. त्याच दिवशी प्रियांकाने सुशांतला दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. तरुण कुमार यांच्या हस्ताअक्षरातील प्रिस्क्रिप्शन पाठवलं.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.