Business Idea : जर तुम्ही नोकरी सोडून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे जो तुम्हाला काही दिवसातच श्रीमंत करू शकतो. हा व्यवसाय करून तुम्ही तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकता.
कारण जास्त पैसा असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज करू शकता. आजच्या आर्थिक युगात प्रत्येकाला मोठा पैसा कमवायचा असतो. अशा वेळी आम्ही तुम्हाला एक चांगली व्यवसाय कल्पना देत आहोत. तुम्ही हा व्यवसाय सुरू करताच तुमची मोठी कमाई सुरू होईल. यामध्ये खर्चही खूप कमी आहे. आम्ही तुम्हाला जर्दाळू तेल बनवण्याच्या व्यवसायबद्दल सांगत आहे.
जर तुम्ही हा व्यवसाय सुरु करणार असाल तर यासाठी तुम्हाला एक युनिट बसवावे लागेल. सध्या बाजारात हर्बल उत्पादनांची मागणी वाढली आहे. फार्मा उद्योगात त्याची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट उभारून तुम्ही बंपर उत्पन्न मिळवू शकता.
जर्दाळू तेलाला कर्नेल ऑयलही म्हणतात. हे जर्दाळूच्या बिया किंवा कर्नलपासून बनवलेले गंधहीन तेल आहे. हे तेल अगदी हलके आहे. हे जगाच्या काही भागांमध्ये अन्नामध्ये देखील वापरले जाते. जर्दाळू कर्नल तेलाचे दोन भिन्न प्रकार आहेत. पहिला वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो आणि दुसरा स्वयंपाकात वापरला जातो.
जर्दाळू तेल बनवण्यासाठी किती खर्च येईल?
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) या युनिटच्या स्थापनेसाठी एक अहवाल तयार केला आहे. जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी एकूण 10.79 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, तुम्ही ते 2 लाख रुपयांपासून सुरू करू शकता. उरलेले पैसे तुम्ही कर्जाद्वारे घेऊ शकता.
हे युनिट उभारण्यासाठी स्वत:ची जमीन किंवा भाड्याची जागा असावी. प्लांट आणि यंत्रसामग्रीसाठी 5 लाख रुपये, फर्निचर आणि फिक्सरसाठी 1.50 लाख रुपये आणि खेळत्या भांडवलासाठी 4.29 लाख रुपये लागतील. या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि इतर घटक आढळतात. हे तेल सामान्यतः मालिशसाठी ओळखले जाते.
जर्दाळू तेलातून मोठे पैसे कसे कमवायचे?
रिपोर्टनुसार, या व्यवसायातून प्रत्येक महिन्याला 60,000 ते 70,000 रुपये कमावता येतात. तुमचा व्यवसाय जसजसा वाढेल तसतसे तुमचे उत्पन्न वाढेल. जर्दाळूचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे केसांसाठी खूप चांगले मानले जाते. हे लावल्याने केसांची लांबी वाढते. महिला या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशा प्रकारे सर्वत्र मागणी असणारा हा व्यवसाय करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता.