धक्कादायक ! रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड शहरामधील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने अचानक फाशी घेतल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलीने अचानक आत्महत्या का केली? याचे कारण अजून समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव देविका नारायण बेहरे आहे. तिचे वडील हे ऑटोरिक्षा चालक आहेत. देविकाने 7 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घरात कोणी नसताना घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

मृत देविकाचे वडील नारायण नागोराव बेहरे यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देविकाने आत्महत्या का केली? तसेच तिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment