Rickshaw Fare Price Hike : मोठी बातमी!! रिक्षा प्रवास महागला, जाणून घ्या नवे दर

Rickshaw Fare Price Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rickshaw Fare Price Hike । प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर येत आहे. रिक्षा प्रवास आता महागला आहे. शेअर रिक्षांच्या भाड्यात 3 ते 5 रुपये आणि मीटरप्रमाणे 3 रुपये वाढ करण्यात आली आहे. हि दरवाढ संपूर्ण महाराष्ट्रासाठी नसून फक्त कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांसाठी आहे. सध्याच्या महागाईच्या काळात रिक्षा प्रवास सुद्धा महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लागणार आहे हे मात्र नक्की….

यापूर्वी कोरोना काळात रिक्षाचालकांनी शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ (Rickshaw Fare Price Hike) केली होती. तेव्हा सुद्धा ३ ते ५ रूपयांनी रिक्षाचा प्रवास महाग झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांनी ३ ते ५ रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. खरं तर, तीन महिन्यांपूर्वी सरकारने भाडेवाढ जाहीर केली होती, परंतु रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत ती अमलात आली नव्हती. आता जवळपास 95 टक्के रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता शेअर रिक्षांमध्ये प्रवासाचे अंतर पाहता 3 ते 5 रुपये आणि मीटरप्रमाणे 3 रुपये भाडेवाढ लागू करण्यात आली आहे .

चाकरमान्यांना फटका – Rickshaw Fare Price Hike

मुंबई नोकरी करणारे चाकरमानी मोठ्या प्रमाणात कल्याण आरटीओ क्षेत्रात राहतात. या चाकरमान्याना घरापासून ते रेल्वे स्थानकांपर्यंत जायचं असल्यास या चाकरमान्यांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. आता रिक्षानेच भाडेवाढ केल्याने (Rickshaw Fare Price Hike) या चाकरमान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांनाही आर्थिक फटका बसणार आहे. रोजच्या प्रवासात ही वाढ लक्षणीय ठरणार आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांचे महिन्याचे बजेट सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. सध्या एका बाजूचा प्रवास १५ रुपयांमध्ये होत आहे. आता १८ ते २० रुपये मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे.