Relianceचे शेअर धडाधड कोसळले; एका क्षणात तब्बल 68093 कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडले. सप्टेंबर तिमाहीत नफा घटल्याने शेअरवर त्याचा परिणाम जाणवला. शुक्रवारी उशिरा कंपनीने तिमाहीचे आकडे स्टॉक एक्स्चेंजला दिले होते. यामुळे सोमवारी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर धडाधड कोसळायला सुरुवात झाली.

बीएसईवर कंपनीचा शेअर 5.54 टक्क्यांनी घटून 1940.50 रुपयांवर आला होता. तर एनएसईवरदेखील 5.57 टक्के शेअर पडून 1940.05 वर आला होता. या पडझडीमुळे कंपनी बाजारमुल्य एका झटक्यात 68093.52 कोटींनी कमी झाले. ते सध्या 13,21,302.15 कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 15 टक्क्यांची घट नोंदविली गेली.

रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण 9567 कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा 15 टक्क्यांनी तुटला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा झाला होता. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात रिलायन्सला परदेशातून करोडो रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.

देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असूनही कंपनीला जूनच्या तिमाहीत 8380 कोटींचा नफा झाला होता. वार्षिक आकडेवारीनुसार कंपनीला शुद्ध नफ्यामध्ये 15 टक्क्यांची घट सहन करावी लागली आहे. कंपनीचे उत्पन्ना 2020-20 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये घटून 1.2 लाख कोटी रुपये झाले. जे वर्षभरापूर्वी 2019-20 मध्ये याच तिमाहीत 1.56 कोटी एवढे होते.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment