RIL Q3 Results: तिसर्‍या तिमाहीत रिलायन्सचा नफा विक्रमी 41.6.% टक्क्यांनी वाढला, निव्वळ नफा 15 हजार कोटींवर पोहोचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीचा डेटा जाहीर केला आहे. गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 41.6 टक्के वाढ नोंदली गेली. कंपनीच्या या वाढीमध्ये, O2C, रिटेल आणि डिजिटल व्यवसायातील मजबूत वाढीसाठी सर्वात महत्वाचे योगदान आहे.

कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 15015 कोटी रुपये होता. तर मागील वर्षी याच काळात ती 11,841 कोटी रुपये होती. त्याच वेळी शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा 9567 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1.18 लाख कोटी रुपये आहे. याचा अंदाज 1.26 कोटी होता. मागील तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1.11 लाख रुपये होते.

कंपनीचे निकाल जाहीर झाल्याच्या निमित्ताने RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, या वेळी जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा विकासाच्या मार्गावर असल्याचे दिसते. वित्तीय वर्ष 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने देशाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे हे पाहून आम्हाला आनंद झाला. ते पुढे म्हणाले की, “O2C, रिटेल सेगमेंट आणि डिजिटल सर्व्हिसेस व्यवसायात प्रचंड पुनरुज्जीवन झाल्यामुळे कंपनीने तिसर्‍या तिमाहीत जोरदार निकाल मिळाला.”

ते म्हणाले की,”भारत सध्या डिजिटल क्रांती आणणाऱ्या जगातील अग्रगण्य देशांपैकी एक आहे. ही वाढ कायम ठेवण्यासाठी रिलायन्स जिओ आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन पिढीचे तंत्रज्ञान आणि देशातील 5G ​​विकसित करण्यावर तसेच देशभरात या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत राहील. ही सेवा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि उपलब्ध करुन देण्यास कंपनी वचनबद्ध आहे.” ते पुढे म्हणाले की,”रिलायन्स जिओच्या 5G सेवांद्वारे आत्मनिर्भर भारताची व्हिजनला पूर्ण करेल.

EBITDA मार्जिनमध्ये 18.3 टक्के वाढ
तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 21566 कोटी रुपये होता. याचा 22100 कोटी रुपये असा अंदाज होता. त्याच वेळी आधीच्या तिमाहीत कंपनीची EBITDA 18945 कोटी रुपये होती. त्याचप्रमाणे तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 18.3 टक्के होता. हा अंदाज 17.4 टक्के होता. त्याच वेळी, कंपनीच्या EBITDA मार्जिन मागील तिमाहीत 17 टक्के होते.

जिओची ARPU सुधारली
2020 डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत रिलायन्स जिओची कामगिरीही उत्कृष्ट आहे. सहाय्यक कंपनी रिलायन्स जिओच्या तिसर्‍या तिमाहीत प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) दरमहा 151 रुपये आहे. हे 149 ते 150 रुपयांच्या अंदाजापेक्षा जास्त झाले आहे. तर शेवटच्या तिमाहीत ते 145 रुपये होते. या कालावधीत तिमाही आधारे कंपनीच्या नफ्यात 15.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत रिलायन्स जिओचा नफा 3489 कोटी रुपये झाला आहे. तिमाही आधारावर तिचा महसूल 5.3 टक्के होता, तर तो 19475 कोटी होता. तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स जिओच्या तिमाही आधारावर EBITDA मध्ये 6.4 टक्के वाढ दिसून आली आणि ती 8483 कोटी रुपये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment