गोंदिया | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या खिलाडी वृत्तीला चालना मिळावी याकरता राज्यभरात सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया येथील सीएम चषक स्पर्धेचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजेच आकाश ठोसर यांनी हजेरी लावली होती.
जिल्ह्यातील सडक अर्जुनी मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच पुरस्कार वितरण सोहळ्याचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सैराट फेम आर्ची आणि परश्या यांनी हजेरी लावली होती. ग्रामीण भागात प्रथमच या दोन्ही कलाकारांनी हजेरी लावल्याने मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती.
सीएम चषक स्पर्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या खिलाडी वृत्तीला चालना मिळावी हा या मागचा उद्देश आहे. दरम्यान आर्ची आणि परशा या दोघांनी यावेळी सैराटचे काही डायलॉग ही म्हणून दाखविले.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.