IND vs ENG: Rishabh Pant ने केला रेकॉर्ड, परदेशात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. परदेशात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्ध पहिल्याडावात शतक आणि दुसऱ्याडावात अर्धशतक झळकावले आहे. परदेशात शतकानंतर अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. धोनी पासून फारुख इंजीनियर पर्यंत कोणीही अशी कामगिरी केली नाही. भारताचे दोनच विकेटकीपर पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्याडावात अर्धशतक झळकवू शकले आहेत. 1973 साली फारुख इंजीनियर यांनी इंग्लंड विरुद्ध मुंबई कसोटीत आधी 121 नंतर 66 धावांची खेळी केली होती. परदेशात अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिला विकेटकीपर आहे.

पंत सुसाट सुटला
पंतने (Rishabh Pant) एजबॅस्टन कसोटीत दुसऱ्याडावात 76 चेंडूत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या डावात इंग्लंडचे वेगवान गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत होते. पण पंत थांबला नाही. त्याने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याडावात 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. पंत एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात 57 धावा बनवून आऊट झाला.

रिव्हर्स स्वीपने घात केला
पंतने (Rishabh Pant) दुसऱ्या डावात रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. जॅक लीचच्या गोलंदाजीवर त्याने रिव्हर्स स्वीप मारला. चेंडू ग्लोव्हजला लागून स्लीप मध्ये उभ्या असलेल्या जो रुटच्या हातात गेला आणि त्याची विकेट पडली.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Leave a Comment