ऋषी कपूर यांची ‘ही’ सहाबहार गाणी आजही पाडतात प्रेमात

मुंबई | सदाबहार अभिनेते म्हणून ओळख असणाऱ्या ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा अखेरचा निरोप घेतला. १९८०-९० हा काळ ऋषी कपूर यांच्या गाण्याने खूप गाजला होता. मात्र गुरुवारी अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि अखंड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. ऋषी कपूर हे आज जरी आपल्यात नसले तरीदेखील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांसोबत असणार आहेत.

ऋषी कपूर यांनी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेकांचा मनात जागा केली. महत्वाचं म्हणजे यांचे फक्त चित्रपटच गाजले नाहीत, तर त्यांच्या अनेक चित्रपटातील गाणीसुद्धा सुपरहिट ठरली आहेत. पाहूयात ऋषी कपूर यांची ही सदाबहार गाणी..

ऋषी कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यांची हम तूम एक कमरे में बंद’, ‘मेरे उमर के नौजवानो’,मैं शायर तो नहीं’, ‘तेरे दर पे आया हूँ’, ‘चाँदणी ओ मेरी चाँदणी’, सोचेंगे तुम्हे प्यार’ ‘‘चेहरा हैं या चाँद खिला है’, ‘परदा हैं परदा’, ‘ये गलिया यें चौबारा’,’, ‘तू तू है वहीं’ ऋषी कपूर यांची ही प्रेमात पाडणारी गाणी आहेत. ही गाणी ऐकताना ऋषी कपूर आपल्या सोबत असल्याचं भास नक्की होईल.

You might also like