ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे दावेदार असलेल्या ऋषी सूनक यांच्या पत्नीच्या ‘या’ फोटोची जोरदार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री होते. एकीकडे ऋषी सुनक यांची चर्चा सुरु असताना दुसरीकडे त्यांची पत्नी अक्षता मूर्ती देखील सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यादरम्यान त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या एका ट्रेमध्ये चहा आणि नाश्ता घेताना दिसत आहे. हे चित्र कुठले आहे ? या फोटोची वास्तविकता आम्ही तुम्हाला सांगतो.

अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक यांच्या राजीनाम्यानंतर ६ जुलै रोजी काही पत्रकार आणि फोटोग्राफर त्यांच्या लंडनमधील घराबाहेर त्यांची वाट पाहत होते. यादरम्यान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती पत्रकारांसाठी चहा-नाश्त्याने भरलेला ट्रे घेऊन बाहेर आल्या आणि सर्वांचा पाहुणचार केला. यानंतर त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही जणांनी अक्षताच्या पाहुणचाराचे कौतुक केले, तर काहींनी त्या चहाच्या कपच्या किमतीकडे लक्ष वेधले. अनेक वापरकर्त्यांनी याला एम्मा लेसी कप म्हटले.

तर दुसरीकडे काही जणांनी अक्षता मूर्तीच्या या फोटोची तुलना बोरिस जॉन्सनच्या फोटोशी केली गेली. जॉन्सन यांनीही 2018 मध्ये पत्रकारांसाठी असाच चहा आणला होता. तेव्हा बोरिस पंतप्रधान नव्हते. त्यामुळे काही लोकांनी या दोन्ही फोटोंची तुलना करत सुनकही आता पंतप्रधान होतील असं म्हंटल आहे.

Leave a Comment