हॅलो महाराष्ट्र | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. कामाच्या गडबडीत त्यांना वेळ नसल्याने ते जंक फूड आणि फास्ट फूडला जास्त प्राधान्य देतात. परंतु नुकतेच हार्वर्ड युनिव्हर्सिटीने संशोधन केलेले आहे. या संशोधनात असे आढळून आलेली आहे की, जे लोक जंक फूड जास्त खातात. त्यांच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. संशोधनातून असे समोर आलेली आहे की, जे नियमितपणे बाहेरून तयार केलेले प्रक्रिया केलेले अन्न खातात. त्यांना अकाली मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. यात 30 वर्षाहून अधिक काळ 1 लाख 14 हजार लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी यांनी जीवनशैलीवर लक्ष ठेवून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे फास्ट फूड खाणाऱ्या लोकांसाठी एक धोक्याची घंटा आहे.
अल्ट्रा प्रोसेड फूड म्हणजे काय ?
अल्ट्रा प्रोसेड फुड हे एक असे फूड आहे. ज्यामध्ये साधारणपणे घरात स्वयंपाक घरात वापरलेले पदार्थ वापरला येणार नाही. हे घटक आरोग्याला खूप हानि पोहोचवतात. जसे की संरक्षण रंग आणि कृत्रिम पद्धतीने चरबी निर्माण करणारे जास्त फायबर नसलेले हे अन्न असते. या अल्ट्राप्रोसेड फूड किंवा कॉस्मेटिक फूड असे देखील म्हणतात. यामध्ये अन्नातील नैसर्गिक घटक काढून त्या जागेत कृत्रिम घटक टाकले जातात. त्यामुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये केक, पेस्ट्री, नूडल्स यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.
संशोधनात काय आढळले ?
हा अभ्यास बीएमजे या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केलेला आहे. यात अल्ट्रा प्रोसेड तुमच्या सेवनाने संबंधित जोखीमीबद्दल सांगण्यात आलेले आहे. अधिक प्रक्रिया केलेले अन्न जास्त खाल्ल्याने मृत्यूचा धोका वाढतो. जे लोक नियमितपणे अल्ट्रा प्रोसेड मासांचे सेवन करतात. त्यांना अकाली मृत्यू येण्याची शक्यता13 टक्के असते. जे लोक जास्त प्रमाणात गोड आणि कृत्रिम साखर खातात. त्यांना लवकर मृत्यू होण्याचा धोका 9% असतो.
14 वर्षे चाललेल्या या संशोधनादरम्यान संशोधकांनी 48,193 मृत्यू ओळखले जाते. कर्करोगाने 13557 मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांची संबंधित रोगामुळे एक 11416 श्वसन रोगांमुळे 3926 मृत्यू आणि न्यूरोडीजेनेरेटिव्ह या रोगामुळे 6343 लोकांचा मृत्यू झालेला आहे.