रितेश- जेनेलिया आणि सोनाक्षी सिन्हाने घेतली कोरोना लस; सोबत लोकांना केले हे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाढ्त्या संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक हतबल होऊ लागले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लास उपलब्ध आहे. हि प्रतिबंधक लस आता नागरीक घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचे आवाहन अनेक जण करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली आहे. त्यानंतर सोशल मिडीयावर फोटो शेयर करून इतरांनाही लस घेण्याचे आवाहन केले आहे. आता यात रितेश, जेनेलिया आणि सोनाक्षी सिन्हा यांचाही समावेश झाला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया तसेच सोनाक्षी सिन्हा यांनीही नुकतीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सोशल मिडीयावर लस घेतानाचे फोटो शेयर केले आहेत.

https://www.instagram.com/p/COr074sJDJS/?utm_source=ig_web_copy_link

कोरोनाची हि प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रितेश आणि जेनेलिया यांनी फोटो शेअर केले आहेत. त्यांनी फोटो शेअर करत म्हटले की, लस घेतली…चला या राक्षससोबत एकत्र लढूयात. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेदेखील लस घेतली असून तिने म्हटले आहे की, व्हॅक्सिन म्हणजे विजय. यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांच्या लसीकरणाचे फोटो शेयर करत कोरोनापासून बचा करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.

https://www.instagram.com/p/COrvGG7DKVp/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वी कोरोनाच्या दुसरे लाटेदरम्यान आपल्या चाहत्यांचा मूड बदलण्यासाठी रितेश आणि जेनिलिया नेहमीच विविध मिम्सवर व्हिडीओ बनवायचे. हे व्हिडीओ ते आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट करीत चाहत्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे. त्यातील काही व्हिडीओ तर प्रचंड वायरल झाले होते. यातीळ एका व्हिडिओत रितेश आगरी कोळी गाण्यावर डान्स करताना दिसत होता.

 

https://www.instagram.com/p/COrvasXM2PO/?utm_source=ig_web_copy_link

तर एका व्हिडिओत १९७५ साली धर्मात्मा चित्रपटातील लोकप्रिय गाणे क्या खूब लगती हो हे ऐकायला मिळत आहे आणि ते दोघे हे गाणे गुणगुणताना दिसत आहेत. जेनेलियाने या व्हिडीओला कॅप्शन देत कोरोनाचा उल्लेख केला होता आणि म्हटले होते की या कठीण काळात आपल्याला खूप काही शिकवले आहे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ व्यतित करण्याचा वेळ आहे. तर एका व्हिडिओत ते दोघे वायरल मिम्सवर क्रीएशन करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CNkRh6tDpxd/?utm_source=ig_web_copy_link

 

Leave a Comment