Tuesday, February 7, 2023

#VilasraoDeshmukh75 | रितेशने शेयर केला अतिशय भावनिक व्हिडीओ; वडिलांच्या कुर्त्यात हात घालून केले असे काही

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वि जयंती आहे. यानिमित्त बॉलिवूड अभिनेता आणि देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी अतिशय भावनिक व्हिडीओ शेयर करत वडिलांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. रितेशने एक भावनिक पोस्ट करीत वडिलांना अभिवादन केले आहे. वडिलांच्या एका कुर्त्यात स्वतःचा हात घालून आपल्याच डोक्यावरून हात फिरवत रितेशने वडिलांची आठवण काढली आहे.  त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यासोबत दररोज तुमची खूप आठवण येते असे ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा पपा म्हंटले आहे. हा व्हिडीओ पाहून दिवंगत विलासराव देशमुख यांचे समर्थकही गहिवरले असून या संकटकाळात ते असायला हवे होते असेही म्हणत आहेत.

रितेश देशमुख पत्नी जेनेलिया सोबत नेहमीच व्हिडीओ शेअर करत असतात. पण आजचा त्यांचा व्हिडीओ खूप भावनिक आणि त्यांना त्यांच्या वडिलांप्रती असणारे प्रेम व आदर व्यक्त करणारा आहे. या व्हिडिओमध्ये  दिवंगत नेते विलासराव यांच्या कुर्त्यातून जणू तेच रितेशच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत आहेत. त्याची पाठ थोपट आहेत असा भास होतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे भरून आले आहेत. “अभि मुझमे खी बाकी थोडीसी हैं जिंदगी” हे गाणे बॅकग्राउंडला आहे. व्हिडिओमध्ये विलासराव देशमुख यांचा फोटो तसेच रितेश व त्याच्या वडिलांचा एक पाठमोरा फोटोही आहे.

- Advertisement -

राजकारणातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व अशी विलासराव देशमुख यांची ओळख होती. आपल्या सर्वसामावेशक स्वभावामुळे ते जनतेत लोकप्रिय होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द लक्षणीय होती. रितेश सोबत त्यांचे भाऊ मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी ट्विटरवरून वडिलांना अभिवादन केले आहे. दरवर्षी हा दिवस विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळी बाभळगाव येथे त्यांच्या आठवणीत साजरा केला जातो मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे तो असा व्हर्च्युअली केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”