हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर आणि मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. याच दरम्यान त्याची पत्नी रितिकाने खास रोमँटिक पोस्ट शेअर करत रोहितला शुभेच्छा दिल्या. तू माझ्या आयुष्यात असणं ही माझ्यासाठी सर्वांत खास गोष्ट आहे असnपोस्ट करत रितीकाने रोहित बद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा रो… तू माझ्या आयुष्यात असणं ही माझ्यासाठी सर्वांत खास गोष्ट आहे. तू माझ्यासोबत असण्याने हे जग अधिक सुंदर आहे, अशा शब्दात रितिकाने आपल्या मनातील भावना रोहितच्या वाढदिवशी एका रोमँटिक पोस्टमधून बोलून दाखवल्या आहेत. एकंदरित ‘हमराज’ या हिंदी चित्रपटातील अलका याग्निक यांनी गायलेल्या ‘तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी…’ या गाण्यातील भावना आणि रितिकाच्या भावना मिळत्याजुळत्या आहेत किंबहुना सारख्या आहेत.
https://www.instagram.com/p/COSBV0MFqTG/?igshid=6dsxzmf3hfos
दरम्यान, रितिका-रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांना समायरा नावाची मुलगी पण असून अनेक मॅचेसला रितिका समायराला घेऊन मैदानावर उपस्थिती लावत असते. सध्या रोहित आयपीएल मध्ये व्यस्त असून मुंबई इंडिअन्स च दमदार नेतृत्व करत आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.