हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : ओमप्रकाश शेटे यांच्या पत्नी चे भाऊ जेजुरी ला दर्शनासाठी गेले होते. परतत असतांना सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे सिमेंट मिक्सर आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे बार्शी तालुक्यातील वैराग येथील मेव्हणे बाबा फलफले, त्यांची पत्नी पुजा बाबा फलफले, आजी, तिन बालके, यांचा अपघातात मृत्यु झाला. यात एक मुलगी गंभीर असल्याची माहिती मिळतेय हे सर्वजन अकलूजच्या दिशेने कारने जात होते. त्यावेळी सिमेंट मिक्सरचा कंटेनर याने समोरुन येऊन कारला जोरात धडक दिली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला असून अपघातानंतर कंटेनरही रस्त्याच्या कडेला उलटला आहे. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात कारमधील लोक जागीच ठार झाले आहे.
या अपघातामुळे फलफले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.