नगर-सोलापूर रोडवर 4 वाहनांचा भीषण अपघात ! अपघातात 2 ठार तर 8 ते 10 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील अपघात थांबण्याचे नावच घेत नाही आहेत. रोज कुठे ना कुठे अपघात होतच आहे. अहमनगर- सोलापूर महामार्गावर गुरुवारी रात्री असाच एक भीषण अपघात झाला. 4 वाहनांच्या या भीषण अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मालवाहतूक करणारा एक ट्रक, एक रीक्षा, क्रूझर जीप आणि टू व्हिलर गाडी यांच्यात धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता कि क्रूझर जीप आणि ट्रक यांच्यासह रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय. चार वाहनांच्या विचित्र अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे आणि सोपान दिनकर काळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या इतर दहा जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नगर-सोलापूर रोडवरच्या कोकणगावच्या शिवारात बोराडे वस्तीजवळ हा भीषण अपघात घडला आहे.

कसा झाला अपघात?
नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती इथून एक मालवाहू ट्रक जात होता. हा ट्रक सोलापूरहून नगरच्या दिशेनं निघालेला तर इतर वाहनं नगरहून सोलापरूच्या दिशेनं जात होती. यादरम्यान TN 88 X 9243 या क्रमाकांच्या मालवाहून ट्रकनं MH 09 BM 9859 या क्रमांची क्रूझर आणि MH 09 DM 4557 या क्रमांकाच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यानंतर हि रिक्षा पलटी झाली. तर क्रूझरला दिलेल्या धडकेत गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहतूक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment