नितीन गडकरी यांचा मेगाप्लॅन!! 3 लाख कोटींचे रस्ते उभारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील रस्ते (Expressways In India) मोठ्या प्रमाणात विकसीत झाले आहेत. अजूनही ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरूच आहे. रस्ते विकासामुळे संपूर्ण देशाचा कायापालट झाला आहे. आता देशात आणखी मोठमोठे राष्ट्र उभारताना पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, येत्या तीन महिन्यांत 3 लाख कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल. यासोबतच या आर्थिक वर्षात रस्तेबांधणीत 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काम थोडे संथ होते. यासोबतच येत्या तीन महिन्यांत तीन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे कंत्राट दिले जातील. मार्च 2025 पर्यंत रस्ते बांधण्यासाठी 5 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. मंत्रालयाचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. रस्तेबांधणीसाठी निधीची कमतरता नसून भविष्यात सुद्धा हि कमतरता पडणार नाही असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.

गडकरी पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात NHAI टोलमधून 45000 कोटी रुपये कमवत आहे. येत्या दोन वर्षांत ही कमाई १.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल. रस्त्यांच्या मालमत्तेचे मुद्रीकरण केले जात आहे, ज्यामुळे मंत्रालयाला चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आमच्याकडे पैशांची कमतरता नाही, आमच्याकडे रस्ते प्रकल्पांसाठी पुरेसा निधी आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 3 रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्याची एकूण लांबी 47.04 किलोमीटर आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.