Wednesday, October 5, 2022

Buy now

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने रोड रोमिओला दिला चांगलाच चोप

परभणी : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये आता कॉलेजचे रोड रोमिओ तरुणींची छेड काढून त्यांना त्रास देत असत. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी घडली आहे. यामध्ये सेलू तालुक्यातील तळतुंबा या गावात राहणाऱ्या मुलीची तिच्याच कॉलेजला शिकत असलेला रवळगाव या ठिकाणी राहणारा मुलगा दररोज छेड काढून तिला त्रास देत होता.

सुरुवातीला या मुलीने त्या मुलाकडे दुर्लक्ष केले. यामुळे त्या रोड रोमिओची हिम्मत वाढत गेली. यानंतर या मुलीने रोड रोमिओला चांगलीच अद्दल घडवली. तिने छेड काढणाऱ्या रोमिओला भररस्त्यात गाठून त्याला बेल्टने चांगलाच चोप दिला. मात्र या प्रकरणी सेलू पोलिसात अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. हे प्रकरण समोपचाराने मिटवण्यात आले.

या मुलीने दाखवलेल्या हिम्मतीने सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सेलू शहरातील भर रस्त्यातवर अचानक घडलेल्या घटनेने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे दोन्ही विद्यार्थी कुठल्या वर्गात शिकत होते आणि कुठल्या कॉलेजला होते याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या मुलीने दाखवलेल्या हिमतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.