प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रॉब गिब्स यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक रॉब गिब्स याचे नुकतेच निधन झाले आहे.ते ५५ वर्षांचे होते.पिक्सार स्टुडिओच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. रॉबच्या निधनामागचे कारण अद्यापही समोर आले नाहीये.रॉब हे गेली २० वर्ष हॉलिवूड सिनेमासृष्टीत काम करत होते.

रॉब यांनी पिक्सार स्टुडिओसाठी ‘टॉय स्टोरी २’, ‘फाइंडिंग निमो’, ‘इन्साईड आउट’, ‘मॉन्स्टर’, ‘कार टून्स’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपट तयार केले होते. आपल्या या सुपरहिट कार्टून चित्रपटांमुळे त्यांना लहान मुलांचा दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जायचे.

 

 

पिक्सार स्टुडिओ हे आपल्या कार्टून चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.रॉब गिब्स यांनी या स्टुडिओमध्ये लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी ‘टॉय स्टोरी’ आणि ‘अ बग्स लाईफ’ या चित्रपटांसाठी स्टोरी बोर्ड तयार करण्याचे काम केले होते. त्यानंतर पाहता पाहता त्यांनी कार्टून चित्रपट तयार करण्याचे तांत्रिक तंत्र आत्मसात केले. त्यामुळे दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांना आपले हात आजमवण्याची संधी मिळाली.

आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करत त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘द इन्क्रेडिबल’, ‘रॅटाटुई’, ‘द कार्स’ यांसारख्या ब्लॉगबस्टर चित्रपटांची निर्मिती केली. रॉब आपल्या कामात इतके तरबेज होते, की त्यांच्यामुळे पिक्सार स्टुडिओ थेट ऑस्करपर्यंत मजल मारु शकले. रॉब गिब्स यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment