भारताला मोठा झटका; विश्वविजेत्या संघातील खेळाडूची निवृत्तीची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पा याने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉबिन उथप्पा हा २००७ च्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. तसेच आयपीएल मध्येही त्याने दमदार प्रदर्शन केलं आहे.

निवृत्तीची घोषणा करताना उथप्पाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हंटल की, माझ्या देशाचे आणि माझ्या कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. परंतु सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, रॉबिन उथप्पा 2006 मध्ये आपला पहिला सामना खेळला. २००७ च्या पहिल्या T २० संघाचाही तो महत्त्वाचा भाग होता. भारताच्या अनेक अविस्मरणीय विजयाचा तो भाग राहिला आहे. त्याने 46 एकदिवसीय सामन्यांमध्ये 934 धावा केल्या आहेत. याशिवाय रॉबिनने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमधेही उथप्पाने दमदार प्रदर्शन केलं आहे. 205 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 130 च्या स्ट्राईक रेटने 4952 धावा केल्या आहेत.