…तर मी देखील 249 मॅच खेळलो असतो, रॉबिन उथप्पाने व्यक्त केला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रॉबिन उथप्पाने जेव्हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो जास्त काळ क्रिकेट खेळेल असे अनेकांना वाटले होते. पण त्याचे करिअर 46 वनडे आणि 13 टी-20 मॅचपुरतेच मर्यादित राहिले. या आपल्या छोट्या कारकिर्दीबद्दल सांगताना रॉबिन उथप्पाने संताप व्यक्त केला. बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल करण्यात आल्यामुळे माझे करिअरचे नुकसान झाले असे रॉबिन उथप्पा म्हणाला. रॉबिन उथप्पाने 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तर 2007मध्ये त्याने स्कॉटलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

काय म्हणाला रॉबिन उथप्पा
माझ्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये मी 3 पेक्षा जास्तवेळा एका क्रमांकावर बॅटिंग केली नाही. प्रत्येक तिसऱ्या मॅचमध्ये माझा बॅटिंग क्रमांकामध्ये बदल करण्यात येत होता. जर मी एकाच क्रमांकावर 49 मॅच खेळलो असतो, तर भारतासाठी 149 किंवा 249 मॅच खेळलो असतो असे रॉबिन उथप्पा म्हणाला. रॉबिन उथप्पाने आपल्या कारकिर्दीत 46 वनडेमध्ये 934 रन केल्या, तर 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 249 रन केले आहेत.

माझ्या बॅटिंग क्रमांकामध्ये बदल करण्यात आल्यामुळे टीमला फायदा झाला पण माझे करियर खराब झाले असे वक्तव्य रॉबिन उथप्पाने केले आहे. तसेच उथप्पाने त्याचा सहकारी एस.श्रीसंत यांचेदेखील कौतुक केले आहे. रॉबिन उथप्पाने एस.श्रीसंतची तुलना मोहम्मद शमी आणि कपिल देव यांच्यासोबत केली आहे. एस.श्रीसंतची तुलना तुम्ही कपिल देव आणि मोहम्मद शमीसोबत करू शकता अशी प्रतिक्रिया रॉबिन उथप्पाने दिली आहे.

Leave a Comment