हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. ठाणे पोलीस आयुक्त येथिल महिला कर्मचारी कविता सांगळे यांचा मुलगा अथर्व सांगळे याला Gaucher हा दुर्मिळ आजार झाला आहे.. या आजारावरील उपचार महाग असल्याने महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत हा सर्व खर्च करण्यात यावा याबाबतचे पत्र रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठवलं होत.. रोहित पाटील यांच्या पत्राची दखल घेत मंत्रालयाने अथर्वच्या मोफत उपचाराला मंजुरी दिली आहे.. त्यामुळे अथर्वच्या उपचाराचा मार्ग सुकर झालाय….
याबाबत अधिक माहिती अशी कि, कविता अर्जुन सांगळे या ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा अथर्व सांगळे याला Gaucher हा दुर्मिळ आजार झाला असून या आजारावरती औषध उपचार सुरु असून यासाठी होणारा खर्च जास्तीचा आहे . सरकारी मदतीसाठी कविता सांगळे यांनी रोहीत दादांचे सहकारी कल्याण डोंबिवलीचे युवा समाजसेवक तथा रुग्णसेवक अमितजी कोळेकर यांची भेट घेतली… अमित कोळेकर यांनी याबाबत संपूर्ण माहिती रोहित पाटील यांच्या कानावर घातली. त्यानंतर अथर्व सांगळे याच्या औषोधोपचाराचा खर्च मोफत पार पडावा यासाठी रोहित पाटील यांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहिलं होत. या आजारावरील औषधोपचाराकरीता येणाऱ्या खर्चास महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत एक विशेष बाब म्हणून मंजूरी मिळण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच औषधोपचाराच्या सध्यस्थितीबाबतचा अहवाल आवश्यक त्या कागदपत्रासह उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने कार्यालयास कळविले आहे. त्यामुळे अर्थव सांगळे यास असलेल्या Gaucher ह्या दुर्मिळ आजारावरील औषधोपचाराकरीता येणाऱ्या खर्चास महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत एक विशेष बाब म्हणून मंजूरी मिळण्याबाबत शासनाचे योग्य ते आदेश कृपया निर्गमित करावेत, अशी विनंती रोहित पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना केली होती.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ यामध्ये लक्ष्य घातलं आणि आता मंत्रालयाकडून ठाणे पोलीस आयुक्त ‘ऑफिस येथील कर्मचारी सौ.कविता सांगळे यांच्या मुलाच्या म्हणजेच अथर्व सांगळेच्या Gaucher’s disease या दुर्मिळ आजारवरील मोफत उपचाराच्या फाईलवर आज मंत्रालयातून मंजुरी मिळाली व पुढील कारवाईसाठी ती फाईल पुढे वर्ग करण्यात आली. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्या मुळेच हे सगळं शक्य झालं असं मत कविता सांगळे यांनी व्यक्त केलं आणि रोहित पाटील यांचे आभारही व्यक्त केलेत.