राज्यांना कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठा थांबवणं, याला जबाबदारी घेणं म्हणतं नाहीत- रोहित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । गेले ५ महिने संपूर्ण भारतावर कोरोनाचं संकट आहे. याकाळात केंद्र सरकारकडून राज्यांना मदत केली जात होती. कोरोनावर लस उपलब्ध न झाल्यामुळे सोशल डिस्टन्शिंगबरोबरच मास्क वापरणं हा एकच उपाय होता. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी पीपीई किट अत्यावश्यक आहे. योग्य ती काळजी घेऊनही कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. असं असताना आता केंद्र सरकारने कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवढा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडणार आहे. या सगळ्या प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला या निर्णयावर पुर्नविचार करण्याची विनंती केली आहे.

‘आरटीपीसीआर टेस्ट किट’, पीपीई किट आणि एन-९५ मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. ही कोरोना प्रतिबंधक साधने आजपर्यंत केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येत होती. खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही साधने केंद्राला कमी किंमतीतही मिळू शकतात. पण एकीकडं पेशंटची संख्या वाढत असताना या साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला, हे चुकीचं आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळं केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे जीएसटीचे पैसे देणं गरजेचं होतं. पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितलं आणि आता तर करोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणं म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा,” अशी विनंतीही रोहित पवार यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.