Thursday, March 30, 2023

जुनिअर पवारांनी झेलला जुनिअर ठाकरेंवरील राजकीय वार, म्हणाले..

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उद्धव ठाकरेंच्या नैत्रुत्वात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपचे नेते त्यांना वारंवार लक्ष करताना दिसत आहेत. असाच एक प्रयन्त करत नाशिक येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’च्या संपादकपदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला हाणला होता. ‘कोणताही अनुभव नसताना मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं. ठाकरे आता सगळंच घेऊ लागलेत,’ असं पाटील म्हणाले होते.

मात्र, पाटील यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केलेला शाब्दिक वार आमदार रोहित पवार यांनी झेलत दादांवर जोरदार पलटवार ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ‘आदित्य ठाकरे यांचा अनुभव किती आहे हे पाहण्यापेक्षा त्यांचं काम बघा,’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं आहे.

- Advertisement -

‘चंद्रकांतदादा आदित्य ठाकरेंच्या अनुभवापेक्षा त्यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता,’ असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘भाजपच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसलेल्या एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्या अनुभवाबद्दल तर तुम्हाला बोलायचं नाही ना,’ असा चिमटाही रोहित यांनी चंद्रकांत पाटलांना काढला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.