साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर पवार यांच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. यापार्श्वभुमीवर पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. सदस्य रोहित पवार यांनी “साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा” असं म्हणत आजोबांना भावनिक साद घातली आहे.

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदराच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.” असे रोहित य‍ांनी म्हटलं आहे.

तसेच, ‘राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतो‘ असे रोहित यांनी म्हटले आहे.

‘बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल’ असे म्हणत रोहित यांनी विरोधकांवर टिका केली.

Leave a Comment