Tuesday, January 7, 2025

रोहित- सूर्यकुमार मुंबईची साथ सोडणार?? पलटणला डबल धक्का बसणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ पूर्वीच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईच इंडियन्सच्या संघाचा कणा असलेले रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघेही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे. दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार, हे दोन्ही खेळाडू मेगा लिलावात सहभागी होऊ शकतात. असं झालयास आयपीएल इतिहासातील सर्वत यशस्वी संघ मानला जाणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का असेल. कारण नुकतंच रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकवून दिला आहे, तर सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार बनला आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, रोहित आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्समधून बाहेर पडू शकतात. अशावेळी कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही खेळाडूंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुद्धा रोहित शर्माला घेण्यात रस दाखवू शकेल. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या रूपाने फक्त एक फलंदाजच नव्हे तर कर्णधार सुद्धा संघाला मिळेल. त्यामुळे जर रोहित आणि सूर्या मेगा लिलावात उतरले तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी बोली लागेल हे नक्की.

मुंबईची बिकट परिस्थिती –

दुसरीकडे सूर्यकुमार आणि रोहितने जर मुंबई इंडियन्सची साथ सोडली तर फ्रेंचाइजीला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल. कारण मुंबई इंडियन्सने आत्तापर्यन्त ज्या ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या त्या सर्व फक्त रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. तरीही मागच्या आयपीएलमध्ये रोहितला हटवून मुंबईने हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार केलं. मात्र हार्दिक नेतृत्व करण्यात सपशेल अपयशी ठरला आणि मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. रोहितच्या समर्थकांनी हार्दिकला अनेकदा चिडवलं होते, तसेच मुंबईच्या संघ मॅनेजमेंट सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आयात जर रोहित स्वतःच संघाबाहेर पडला तर मुंबईच्या फॅन बेसवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.