मोठी बातमी | संघात दाखल होताच रोहित शर्माची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दुखापतीतुन सावरून नुकतेच भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतल्याने संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता, तर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा होता.

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकला होता. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही तो उपलब्ध नव्हता. आयपीएलमधील सामन्यात दुखापत झाल्यांनतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केला. ११ डिसेंबरला फिटनेस टेस्ट मध्ये पास झाल्यांनतर तो १४ तारखेला ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता. सिडनीत १४ दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो ३० डिसेंबरला भारतीय संघात सामील झाला. त्याने सरावाला सुरुवात केल्याचे छायाचित्रही बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते.

रोहित शर्माची आता उपकर्णधारपदी नियुक्ती झाल्याने कर्णधार आणि उपकर्णधारच्या जबाबदाऱ्या दोन्ही मुंबईकर सांभाळणार आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे नेतृत्वाची कमान सांभाळत आहे. भारत ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येईल.

मुंबईचा दबदबा-

BCCI नं रोहितही नियुक्ती जाहीर करताच कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या टीमच्या तिन्ही मुख्य जबाबदाऱ्या आता मुंबईकरांकडं आल्या आहेत. भारतीय टीमचा कर्णधार, उपकर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक हे तिघंही मुंबईकर असल्याचा भारतीय क्रिकेटमधला हा एक दुर्मिळ योग आहे. या तिघांशिवाय पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर हे दोन मुंबईकर देखील भारतीय टीमचे सदस्य आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment