हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. सध्याचा श्रीलंका दौरा हा गंभीर युगाचा पहिलाच दौरा आहे. यावेळी भारतीय संघातील टॉप ऑर्डर फलंदाजांनी चक्क बॉलिंग टाकल्याचे पाहायला मिळालं. आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा कालच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मानेच (Rohit Sharma Bowling) हातात बॉल घेतला. रोहितने २ ओव्हर टाकल्या आणि सर्वानाच आश्चर्यचकित केलं, कारण याच रोहितने बॉलिंग करणार नाही असं म्हंटल होते. त्यामुळे प्रशिक्षक गंभीरपुढे रोहितचे काय चालेना का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 2 ओव्हर्स टाकलया, यादरम्यान त्याने 11 धावा दिल्या. मात्र रोहितला एकही विकेट मिळाली नाही. 8 वर्षांत रोहित शर्माला वनडे सामन्यात गोलंदाजी करताना पाहण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी रोहितने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध एक ओव्हर टाकली होती आणि तेव्हा विकेट मिळ्वण्यातही त्याला यश आलं होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी केली. मात्र रोहितच्या गोलंदाजी करण्यामागे गौतम गंभीरची स्ट्रॅटजी होती का? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण टी-20 सिरीजमधील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी गोलंदाजी केल्यानंतर आता तू सुद्धा गोलंदाजी करणार का? असा सवाल केला असताना रोहितने स्पष्टपणे नकार देत आपण केवळ फलंदाजीवर फोकस करणार असल्याने म्हंटल होते.
भारताचा पराभव –
दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अनपेक्षित पराभव झाला. श्रीलंकेच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 240 रन्स केल्या, मात्र श्रीलंकन फिरकीपटूंसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या ९७ धावांच्या सलामीनंतरही टीम इंडियाचा डाव अवघ्या २०७ धावांत गुंडाळला. टीम इंडियाची ,मधली फळी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. जेफ्री वंडरसे यांच्या लेगस्पिन फिरकीपुढे भारतीय फलंदाज पुरते चाचपडले, त्याने ६ बळी घेतलं श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आणि संघाला अश्यक्यप्राय असा विजय मिळवून दिला.