हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक फलंदाज आणि मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच विक्रम नोंदविली आहेत. तसेच आयपीएलमध्येही त्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे. रोहित मुंबई इंडिअन्स मध्ये आल्या नंतर मुंबईच नशीबच बदलले.रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
यंदाच्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात रोहित शर्माने आपला खेळ दाखवला तर त्याच्या नावावर काही मोठे विक्रम नोंदविले जाऊ शकतात. जाणून घेऊया रोहित शर्मा या आयपीएल हंगामात कोणते विक्रम नोंदवू शकेल.
★IPL मध्ये 5000 धावा –
रोहित शर्माने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १८८ सामने खेळताना ३१.६० च्या सरासरीने १ शतक आणि ३६ अर्धशतकांसह ४८९८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी १०२ धावांची गरज आहे. जर त्याने हा टप्पा यंदा पार केला, तर तो आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तिसराच फलंदाज ठरेल. त्याच्याआधी विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी हा पराक्रम केला आहे.
★आयपीएलमध्ये ४ हजार धावा करणारा मुंबई इंडियन्सचा पहिला खेळाडू –
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळताना १४३ सामन्यांमध्ये ३७२८ धावा केल्या असून यात त्याने २८ अर्धशतके झळकावली आहेत.
आयपीएलच्या या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून ४ हजार धावा करू शकतो. हा टप्पा त्याने पार केला तर आयपीएलमध्ये खेळताना मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये ४ हजार धावा काढणारा तो पहिला खेळाडू ठरेल.
★आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू –
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक २०९ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माच्या नावावर १९४ षटकार आहेत. रोहित शर्मा या हंगामात एमएस धोनीचा हा विक्रम मोडू शकतो.
★सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम –
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १२५ सामन्यात २१ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.एबी डिव्हिलियर्स २० सामनावीर पुरस्कारासह दुसर्या क्रमांकावर आहे. तर एमएस धोनी, डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा १७ पुरस्कारांसह संयुक्तरित्या तिसर्या क्रमांकावर आहेत. जर आयपीएलच्या संपूर्ण सत्रात रोहित शर्माची कामगिरी चांगली राहिली तर तो ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’