हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फक्त भारतातच नव्हे संपूर्ण जगभरात राहते आहेत. त्यामुळे सचिन तेंडुलकरने आणखीन काही काय खेळायला हवे होते, असे सर्वांनाच वाटते. परंतु वयाच्या 40 वर्षापर्यंतच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मैदानात खेळताना दिसला. तसेच, महेंद्रसिंग धोनीने देखील 39 वयापर्यंतच मैदान गाजवले. थोडक्यात सांगायचे म्हणजे एखाद्या खेळाडू वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत पोहोचला की त्याची निवृत्ती जवळ येते. आता इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 37 वर्षांचा आहे. पुढे 2026 मध्ये टी-20 वर्ल्डकपवेळी त्यांचे वय 39 असेल.
त्यामुळेच 2026 चा वर्ल्डकप रोहित शर्मासाठी शेवटचा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु रोहित शर्माची 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळेच रोहित शर्मा पुढे जाऊन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी BCCI ला खेळाडूंच्या वय आणि निवृत्ती संदर्भात एक मोठा सल्ला दिला आहे. योगराज सिंग यांनी, “बीसीसीआयने खेळाडूंचं वय आणि निवृत्ती याबाबत विचार करु नये” असे सांगितले आहे. तसेच, “जोपर्यंत रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस कायम आहे त्याला खेळू द्यावं” असेही सुचवले आहे.
इतकेच नव्हे तर, “रोहित शर्मामध्ये अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. तो वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत भारताकडून खेळू शकतो”असे मोठे विधान योगराज सिंग यांनी केले आहे. स्पोर्ट्स 18 शी बोलताना योगराज सिंह म्हणाले, “जेव्हा वयाबद्दल चर्चा होते तेव्हा मला समजते की, या खेळाडूचं इतकं वय झालंय या चर्चेला अर्थ नाही. जरी तुम्ही 40, 42 किंवा 45 वर्षांचे असलात, तरी त्यात चुकीचं काय? आपल्या देशात लोकांना तुम्ही 40 वर्षाचे असलात तर वय झालं आहे असं वाटतं. आता तुमचं मूल होण्याचं वय झालं असून सगळं संपलं आहे असं सांगतात. पण तुम्ही संपला नाहीत हेच सत्य आहे,”
त्याचबरोबर, “मोहिंदर अमरनाथ यांनी भारतासाठी वर्ल्डकप जिंकला तेव्हा 38 वर्षांचे होते. अंतिम सामन्यात ते प्लेअर ऑफ द मॅच होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वयाचा मुद्दा कायमचा बंद केला पाहिजे. रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग हे असे दोन महान खेळाडू आहेत ज्यांना कधीच फिटनेस आणि ट्रेनिंगचा विचार केला नाही. तो 50 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकतो” असे स्पोर्ट्स 18 शी बोलताना योगराज सिंह यांनी म्हणले.