हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य या मॅच कडे लागलं आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय चाहत्यांना धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकादा जखमी झाला असून आज सरावादरम्यान फलंदाजी करताना रोहितला दुखापत झाली. मात्र तरीही त्याने पुढे आपला खेळ सुरु ठेवला. परंतु पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितला दुखापत होणं टीम इंडियाला परवडणार नक्कीच नाही.
नेमकं काय घडलं?
सराव सत्रादरम्यान रोहितला स्पेशलिस्टच्या थ्रो डाऊन बॉलचा फटका बसला. फलंदाजी करताना रोहितच्या बोटाला चेंडू लागला. यानंतर फिजिओने तत्काळ रोहितच्या दुखापतीबाबत अपडेट घेतले. या सर्व प्रकारामुळे रोहितच्या फलंदाजीच्या सरावावरही काही काळ परिणाम झाला, पण नंतर रोहितने पुन्हा सराव सुरू ठेवला. खरं तर रोहितच्या हाताला दुखापत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाल्याने भारतीयांचा जीव भांड्यात पडला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.पहिल्या सामन्यात अमेरिका सारख्या नवख्या संघाने पाकिस्तानला पराभूत केल्याने नक्कीच पाकिस्तान बॅकफूटवर असेल तर भारताने आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा दणदणीत प्रभाव केल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. आता पाकिस्तानला पराभूत करत नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न रोहित सेनेचा असेल. उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य असणार आहे.