रोहित शर्माच आहे सरस कर्णधार; कल्पक नेतृत्त्वाची अनेकदा दाखवली चुणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी T 20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरं तर रोहित शर्माचे नेतृत्वगुण हे कोहली पेक्षा जास्त चांगले आहेत या कोणतीही शंका नाही.

काय आहेत रोहितचे मजबूत पक्ष

रोहित शर्मा हा शांत आणि संयमी कर्णधार म्हणून ओळखला जातो. सामन्याची परिस्थिती कशीही असली तरी आपल्या शांत डोक्याने प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारण्याची ताकद रोहित शर्मा कडे आहे. संघातील युवा खेळाडूंना अनेकदा प्रोत्साहन देत मार्गदर्शन करताना देखील आपण रोहितला पाहिले आहे.

मुंबई इंडिअन्सला तब्बल 5 वेळा बनवले चॅम्पियन

2013 मध्ये, मुंबई इंडियन्सने रिकी पॉन्टिंगकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे कमान सोपवली. रोहितला कर्णधार करताच मुंबई इंडियन्सचे नशीब पालटले. आणि प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात मुंबईचा संघ यशस्वी झाला. त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिले नाही. रोहितने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले.

आशिया कप मध्ये भारताला विजेतेपद

2017 मध्ये रोहित शर्माला प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भारताने ही वनडे मालिका 2-1 ने जिंकली. 2018 मध्ये, रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला प्रथम निदाहास ट्रॉफी जिंकून दिली आणि नंतर त्याच वर्षी आशिया कप जिंकला. आतापर्यंत 19 आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहितने नेतृत्व केले असून 15 विजय मिळवले आहेत, तर संघाला केवळ 4 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. एकदिवसीय क्रिकेटमध्येही, 10 सामन्यांमध्ये कर्णधार असताना रोहितने 8 मध्ये यश मिळवले आणि केवळ 2 सामने गमावले

विराट एकदाही आयपीएल जिंकण्यात अयशस्वी

आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरुचे नेतृत्व करताना तब्बल 9 वर्षात एकदाही विराट कोहली आरसीबी ला आयपीएल चषक जिंकवून देऊ शकला नाही. संघात अनेक रथी-महारथी असून देखील बंगळुरुच्या संघाला विजेतेपद देण्यात विराट नक्कीच अपयशी ठरला.

विराट कोहलीला 2017 मध्येच भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधार बनवण्यात आले. आतापर्यंत 45 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 27 जिंकले आहेत, तर संघाला 14 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. 2 चा निकाल येऊ शकला नाही आणि दोन्ही सामने बरोबरीत सुटले.

Leave a Comment