हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे, मात्र त्याआधी काही खेळाडूंना रितें करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच संघ आपल्या महत्वाच्या खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. रिपोर्टनुसार, सर्व संघाना जवळपास ६ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची मुभा मिळू शकते. असं झाल्यास आयपीएल मधील महाराष्ट्राची टीम मुंबई इंडियन्स नेमकं कोणकोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार आणि कोणाला रिलीज करणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईत रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह सारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मात्र मागील आयपीएल हंगामात ज्याप्रकारे रोहित शर्माला मुंबईने कर्णधारपदावरून पायउतार केलं, ते पाहता रोहित पुन्हा मुंबईच्या जर्सीत दिसणार कि नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी ३ कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे मुंबईकरांचा लाडका रोहित पुन्हा एकदा निळ्या जर्सीतच पाहायला मिळू शकतो. कसे ते सविस्तर पाहुयात….
१) जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची मुभा –
रिपोर्टनुसार, यंदाच्या आयपीएल मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय सर्व फ्रेंचायजीना आपल्या ६ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. असं झाल्यास रोहित शर्माचे रिटेन्शन नक्की मानलं जात आहे. मुंबईकडे हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह असे महत्वाचे खेळाडू आहेत. जर ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाली तर मुंबई इंडियन्ससाठी हे सोप्प जाईल. भलेही रोहितने अतिरिक्त पैसे मागितले तरी मुंबई ते देऊ शकेल.
२) रोहितचा फॉर्म – Rohit Sharma
रोहित शर्मा हा सध्या तुफान फॉर्मात आहे. भलेही आज रोहित ३७ वर्षाचा असेल परंतु जस जस त्याच वय वाढतंय, तस तस त्याचा खेळ आणखी आक्रमक होत आहे. यंदाच्या T20 वर्ल्डकप मध्ये भारताकडून सार्वधिक धावा रोहित शर्मानेच काढल्या आहेत, ते सुद्धा आक्रमक खेळीने … नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका विरुद्धच्या सिरींजमध्येही रोहितची बॅट चांगलीच तळपली. मुंबई इंडियन्स साठीही रोहितने अनेकदा महत्वपूर्ण खेळी करत हरलेले सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे रोहितचा सध्याचा फॉर्म बघता मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करण्याची चूक करणार नाही असं वाटतंय.
३) रोहित शर्माचा अनुभव –
यातील तिसरा आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे रोहितचा (Rohit Sharma) अनुभव…. रोहित शर्माने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला तब्बल ५ वेळा चॅम्पियन केलं आहे. भलेही मागील वर्षी फ्रेंचायजीने रोहित ऐवजी हार्दिकला कर्णधार केलं, मात्र याचा उलट परिणाम संपूर्ण संघावर झाला आणि मुंबईचा संघ तळाला गेल्याचे पाहायला मिळालं. रोहित २०१३ पासून मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. त्यामुळे संघबांधणीपासून ते वानखेडे वरील पीच पर्यंतचा त्याचा अनुभव संघासाठी नक्कीच उपयुक्त पडेल यात शंका नाही. त्यामुळे ज्याप्रकारे वय वाढूनही चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंघ धोनीला संघात कायम ठेवते, त्याचप्रमाणे रोहितला सुद्धा मुंबई इंडियन्स संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.