व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहलीच्या खराब फॉर्म बद्दल रोहित स्पष्टच बोलला; म्हणाला की ….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली. मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ 26 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 18 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावरून कर्णधार रोहित शर्माला कोहलीच्या खराब फॉर्म बाबत विचारले असता त्याने स्पष्टच उत्तर दिले

विराटच्या फॉर्मबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रोहित म्हणाला, ‘विराटला आत्मविश्वासाची गरज आहे का? तूम्ही काय बोलत आहात ? विराटच्या फॉर्मची आम्हाला चिंता नाही. शतक न होणे ही वेगळी बाब आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्याची काही चूक आहे असे मला वाटत नाही. संघ व्यवस्थापनाला त्याच्या फॉर्मची चिंता नाही. खेळाडू आणि वैयक्तिकरित्या आम्हाला माहित आहे की आम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

दरम्यान, विराट कोहलीचा फॉर्म हा गेल्या काही दिवसांपासून हरवला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या सामन्यात देखील त्याच्या बॅट मधून धावा निघाल्या नाहीत. भारताने ही मालिका जिंकली असली तरी विराटचा हरवलेला फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने प्रथमच संघाचे फुल टाइम नेतृत्त्व करत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला.