Rohit Sharma वाढदिवस विशेष : HITMAN रोहित शर्माचे ‘हे’ 5 रेकॉर्ड तोडणं केवळ अशक्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनरोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव, आक्रमक फलंदाजी, खेळण्याची वेगळी शैली, कोणत्याही चेंडूवर सहज धावा काढण्याची कला, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करण्याची ताकद…. या सर्व गुणांमुळेच रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनला हे मात्र नक्की…. आज रोहित शर्मा चा 35 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी आपण जाणून घेऊया रोहितने केलेले असे काही रेकॉर्ड जे तोडणं जगातील भल्या भल्या खेळाडूंनाही शक्य नाही.

वन-डे मध्ये 3 द्विशतक(Rohit Sharma)-

होय, विश्वास बसणार नाही, पण हे शक्य केलंय आपल्या रोहितने.. वन-डे क्रिकेट मध्ये जिथे 1 द्विशतक मारणं भल्या भल्या खेळाडूंना जमत नाही तिथे रोहितने (Rohit Sharma) आत्तापर्यंत तब्बल 3 वेळा द्विशतक झळकवत आपल्या नावावर खास रेकॉर्ड केला आहे. यातील 1 द्विशतक बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरोधात आहे तर 2 द्विशतके श्रीलंकेविरुद्ध मारलेली आहेत. त्यामुळे आजही जेव्हा रोहित 50 धावा करतो तेव्हा त्याच्या चाहत्यांना द्विशतकाची चाहूल लागते…

Rohit Sharma

T-20 मध्ये 4 शतके –

T 20 हा क्रिकेट मधील तसा सर्वात लहान प्रकार.. 20 ओव्हरची मॅच असल्याने फलंदाजीला तसा जास्त वेळ मिळतच नाही. पण रोहितने (Rohit Sharma) या प्रकारातही तब्बल 4 शतके मारून आपला आक्रमक बाणा जगाला दाखवून दिला. T-20 मध्ये 4 द्विशतक झळकावणारा रोहित हा सध्या तरी जगातील एकमेव फलंदाज आहे.

Rohit Sharma

वन-डे मध्ये सर्वोच्च 264 धावा-

वाचून धक्का बसला ना.. पण होय, हा कोणत्या संघाच्या धावा नसून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एकट्याच्या धावा आहेत. त्याने या धावा श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे काढल्या आहेत. ईडन गार्डनच्या मैदानात रोहित शर्मा नावाचे वादळ आले आणि अक्खा श्रीलंकेचा संघ त्या वादळात वाहून गेला. रोहितने 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 264 धावांची खेळी केली जी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

Rohit Sharma

एकाच विश्वचषक स्पर्धेत 5 शतके

2019 चा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा हि भारतीय चाहत्यांना काही खास गेली नाही. उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि आपण स्पर्धेतून बाहेर गेलो. पण या संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेला फलंदाज कोणी होता तर तो फक्त रोहित शर्मा… (Rohit Sharma) तब्बल 5 शतके झळकावत रोहितने भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. एकाच विश्वचषक स्पर्धेत 5 शतके मारण्याचा रेकॉर्ड रोहितने आपल्या नावावर केला

Rohit Sharma

IPL मध्ये मुंबईला 5 वेळा केलं चॅम्पियन-

2008 पासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडिअन्सची कामगिरी सुरुवाती पासूनच म्हणावी तशी खास नव्हती. मात्र 2013ला रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईचा कर्णधार झाला आणि संघाचे नशीबच बदलले. रोहितच्या नेतृत्त्वाखाली 2013, 2015, 2017, 2019, 2020 असे तब्बल 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली. मुंबई सोडून इतर कोणत्याही संघाने आयपीएल इतिहासात आत्तापर्यंत 5 ट्रॉफ्या जिंकल्या नाहीत

हे पण वाचा: IPL चा TRP कसा काय घसरला?? जाणून घेऊ यामागील कारणे

 

 

Leave a Comment