T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माची खास पोस्ट; तुम्हालाही वाटेल अभिमान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अतिशय रोमांचक अशा या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विजय खेचून आणला. या विजयानंतर जगभरातून टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) ट्विटर वर स्वतःचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत.

काय आहे रोहितची पोस्ट ?

फोटो या गोष्टीचं प्रतीक आहे की यावेळी माझ्या भावना काय आहेत… कालचा दिवस माझ्यासाठी काय होता हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे अनेक शब्द आहेत. पण कोणत्या योग्य शब्दाचा उपयोग करू कळत नाही… पण मी असं करेल आणि माझ्या भावना व्यक्त करेल…सध्या मी एक स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद घेत आहे जे स्वप्न अरबो लोकांनी पाहिलं…असं म्हणत रोहित शर्माने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

रोहितची T20 क्रिकेटमधून निवृत्ती –

दरम्यान, भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 क्रिकेट मधून निवृत्त्ती जाहीर केली. हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही सर्व सीमा पार करून वर्ल्डकप जिंकलो याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती (Rohit Sharma Retirement) जाहीर केली.

कस आहे रोहितचे T20 करिअर ?

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहोतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.