हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ मार्च पासून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ तयारीला लागले आहेत. यंदाची IPL सर्वात आधी चर्चेत आली जेव्हा मुंबई इंडिअन्सने आपला यशस्वी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) नारळ देत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या हातात मुंबईची धुरा दिली. संघांच्या या निर्णयानंतर चहुबाजूनी मुंबई इंडियन्स फ्रॅन्चायजीला टीकेचा सामना करावा लागला. तसेच मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फॅन फॉलोअर्स सुद्धा कमी झाला.. याचे कारणही तितकंच खास आहे. कारण रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो.
२०१३ मध्ये मुंबईने रोहित अवघ्या २ कोटींमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. त्यावेळी मुंबईच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा होता. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. मात्र सुरुवातीच्या काही सामन्यात पंटरची बॅट चाललीच नाही, सुमार फलंदाजीमुळे मुंबईने सुरुवातीचे अनेक सामने गमावले आणि आयपीएलच्या मध्यात रोहित शर्माला मुंबईने कर्णधार केलं… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोहितने (Rohit Sharma) मुंबईचे नेतृत्व करत संघाला अशक्य वाटणारी आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली…. २००८ पासून ज्या आयपीएल ट्रॉफीची मुंबईकर आतुरतेने वाट बघत होते ती ट्रॉफी रोहितच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने जिंकली….
५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली- (Rohit Sharma)
यानंतर रोहितने कधीही मागे वळून बघितलं नाही… आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि कल्पक नेतृत्वाने रोहित शर्माने मुंबईकरांची मने जिंकली …. सचिन तेंडुलकर नंतर सर्वात जास्त प्रेम मुंबई इंडियन्सने कोणावर केलं असेल तर तो म्हणजे मुंबईकरांचा लाडका रोहित शर्मा (Rohit Sharma) … रोहितने खास रणनीती आखत मुंबईच्या संघाची योग्य अशी बांधणी केली.. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, टिळक वर्मा, नितीश राणा अशा युवा खेळाडूंना घडवलं.. केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लॉगन, टीम डेव्हिड, कोरी अँडरसन यांच्या साथीने एक मजबूत संघ तयार केला आणि एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आज मुंबई इंडियन्सला जो मान मिळत आहे त्याच्या सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त रोहित शर्मालाचा …. आता जरी मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवलं असलं तरी त्याच महत्व कधीही कमी होणार नाही…. शेवटी एवढच सांगावं लागेल कि… मुंबईचा राजा रोहित शर्मा!!….. तो आला.. त्याने पाहिलं आणि ५ वेळा मुंबईला जिंकवूनही दिलं