Monday, February 6, 2023

चढ -उतार हा खेळाचा भाग, प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला- रोहित शर्मा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

रोहित म्हणाला, ‘चढ -उतार हा खेळाचा एक भाग आहे. तसेच हा हंगाम शिकण्यासारखा होता . पण, हे १४ सामने या संघाने गेल्या दोन ते तीन वर्षांत मिळवलेले वैभव हिरावून घेऊ शकत नाहीत. निळा आणि सुवर्ण रंग परिधान केलेला प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला आणि त्याने आपला सर्वोत्तम खेळ केला. आणि हिच कामगिरी आपल्याला संघ बनवते जे आपण आहोत.. एक कुटुंब,’ असा संदेश यावेळी रोहितने दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई इंडिअन्स ने यंदाच्या आयपीएल मधील 14 पैकी 7 सामने जिंकले तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे साखळी फेरीतच मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.