हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma। भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्या रोहित शर्माला बीसीसीसीआयने अचानकपणे वंदे कर्णधार पदावरून काढलं होते, त्याच रोहित शर्माला आता पुन्हा कर्णधार करण्याची वेळ बीसीसीसीआयवर येतेय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. त्यातच उपकर्णधार श्रेयश अय्यर हा सुद्धा दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे कर्णधारपद कोणाकडे सोपवायचा या विचारात बीसीसीआय आहे. अशावेळी पुन्हा रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडू शकते असं बोलले जात आहे.
वृत्तांनुसार, बीसीसीआयने पुन्हा एकदा एकदिवसीय कर्णधारपद स्वीकारण्याबाबत रोहित शर्माशी (Rohit Sharma) संपर्क साधला आहे. कारण भारतीय संघाचे नेतृत्व या मालिकेत अनुभवी खेळाडूने करावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. परंतु रोहित शर्मा हे कर्णधारपद स्वीकारेल कि नाही याबाबत अजूनही स्पष्टता समोर आली नाही. कदाचित ज्याप्रकारे रोहितचे कर्णधारपद काढून घेण्यात आलं होते ते बघता रोहित पुन्हा कर्णधार होण्यास उत्सुक असेल असं वाटत नाही.
के एल राहूलचा पर्याय
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलला सर्वात मजबूत कर्णधार पर्याय मानला आहे. केएल राहुलने यापूर्वी अनेक वेळा भारताचे नेतृत्व केले आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये उपकर्णधार म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे, जर रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारले नाही, तर त्याच्या जागी के एल राहुलला कर्णधारपद दिले जाऊ शकते.
रोहित शर्माचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड– Rohit Sharma
एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा खूपच चांगला राहिला आहे. रोहितने ४६ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केलं. त्यापैकी ३४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला तर १० सामने गमवावे लागले. रोहितच्या विजयाची टक्केवारी ७५ आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने अंतिम फेरीत मजल मारली होती. यानंतर गतवर्षी पार पडलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालीच टीम इंडिया विजेता बनली होती.




