हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2024) भारतीय क्रिकेट संघ अमेरिकेला पोचला असून ५ जूनला आयर्लंड विरुद्ध भारतीय संघाचा पहिला सामना होणार आहे. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र रोहित शर्माने सलामीला नव्हे तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर यावं असा सल्ला माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी दिलाय. जाफरने ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता हा बदल टीम इंडियामध्ये पाहायला मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे.
काय म्हणाला वसीम जाफर –
वसीम जाफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहली आणि जयस्वाल जैस्वाल यांनी विश्वचषकात सलामीला आले पाहिजे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी 3 आणि 4 व्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, मात्र हे आपल्याला कशा प्रकारची सुरुवात मिळते यावर अवलंबून आहे.. रोहित फिरकी खूप छान खेळतो त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर असणे ही त्याच्यासाठी चिंतेची बाब नसावी. असे मत वसीम जाफरने व्यक्त केलं.
Kohli & Jaiswal should open in the World Cup imo. Rohit & SKY should bat 3&4 depending on the start we get. Rohit plays spin really well so batting at 4 shouldn't be a concern. #T20WorldCup #INDvPAK #INDvIRE pic.twitter.com/nMgwwaDNXb
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 29, 2024
मधल्या फळीत रोहितची कामगिरी कशी आहे?
3 आणि 4 क्रमांकावर फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माचा विक्रम तसा काय वाईट नाही. 3 आणि 4 क्रमांकावर फलंदाजी करताना रोहितने आत्तापर्यंत 2 टी-20 सामन्यांमध्ये 39.37 च्या सरासरीने 315 धावा केल्या आहेत, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे जर विराट कोहली सलामीला उतरला तरीही टीम इंडियाला नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आत्तापर्यंत ९ सामने खेळले असून यामध्ये त्याने 57.14 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. टी-२० मधील त्याचे एकमेव शतक सुद्धा सलामीवीर म्हणूनच जमलं. 2022 च्या आशिया कपमध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावा केल्या होत्या. त्यामुळे वसीम जाफरचा सल्ला चुकीचा आहे असेही म्हणता येत नाही.