Rose Water For Face : रोझ वॉटर लावा रोज रोज; उन्हाळा असो किंवा पावसाळा.. त्वचा राहील एकदम सॉफ्ट

Rose Water For Face
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rose Water For Face) बिघडती जीवनशैली जशी शारीरिक आरोग्यावर परिणाम करते. अगदी तशीच आपल्या त्वचेच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम करत असते. शिवाय वाढते प्रदूषण, धूळ, माती यामुळे त्वचेच्या पोअर्सचे आतून नुकसान होत असते. ज्यामुळे तुमची त्वचा रखरखीत आणि निस्तेज दिसू लागते. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर नियमित स्वरूपात रोझ वॉटर म्हणजेच गुलाब जलचा वापर करा. गुलाब जलमध्ये असे अनेक घटक आहेत जे आपल्या त्वचेला सुंदर आणि नितळ होण्यासाठी मदत करू शकतात.

त्यामुळे बरेच लोक आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये आवर्जून गुलाब जलचा वापर करतात. मुख्य म्हणजे, गुलाब जलमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. (Rose Water For Face) जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सिद्ध होतात. म्हणूनच, उन्हाळा असो किंवा पावसाळा.. तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मऊ हवी असेल तर नियमित चेहरा धुतल्यानंतर त्यावर गुलाब जल लावा. आता रिफ्रेशिंग त्वचा मिळावी म्हणून नेमका गुलाब जलचा वापर कसा करावा? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

फेस टोनर (Rose Water For Face)

तुमच्या नियमित स्किन केअर रुटीनमध्ये गुलाब जलचा समावेश करा. चांगल्या परिणामांसाठी तुमच्या रेग्युलर क्लींजरने चेहरा धुतल्यानंतर एका कॉटन बॉलवर गुलाब पाणी घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर टॅप करत लावा. यामुळे पोअर्सेसमधील तेल निघून जाईल. यामुळे त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसेल.

फेस पॅक

तुम्ही तुमच्या रोजच्या फेसपॅकमध्ये गुलाब जलचा वापर करून चेहऱ्याला लावू शकता. (Rose Water For Face) यामुळे त्वचा मुलायम, तेजस्वी आणि चमकदार होईल. याशिवाय एका वाटीत बेसन, हळद आणि चंदन पावडरसोबत गुलाब जल मिसळून तयार केलेला फेसपॅक वापरला तर त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळेल.

मेकअप रिमूव्हर

मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कोणतेही केमिकलयुक्त क्लींजर वापरण्यापेक्षा गुलाब जलचा वापर करा. यासाठी एका कॉटन बॉलवर गुलाब जल घेऊन न घासता चेहऱ्यावरील मेकअप काढा. (Rose Water For Face) यामुळे तुमच्या स्किन पोअर्समध्ये मेकअपचे कण जाणार नाहीत आणि यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड राहील.

मिस्ट

दिवसभर तुमचा चेहरा फ्रेश दिसण्यासाठी नियमित गुलाब जलचा वापर करता येईल. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जल टाका आणि दिवसभर थोड्या थोड्या वेळाने हे गुलाब जल चेहऱ्यावर स्प्रे करा. (Rose Water For Face) ज्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार राहील.