पुणे | रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंट यांच्या तर्फे ’द लास्ट वर्ड’ या वार्षिक आंतर संस्था वादविवाद स्पर्धेचे आयोजन नुकतेच सुमंत मुळगावकर सभागृह, आयसीसी टॉवर सेनापती बापट रोड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या कॅडेट ट्रेनिंंग विंगने आणि आर्मी पब्लिक स्कुल, खडकी ने आपआपल्या गटांत विजेतेपद पटकावले.
हा उपक्रम १९८९ मध्ये सुरू झाला असून यंदा ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या कॅडेट ट्रेनिंंग विंगचे प्रतिनिधित्व जोरावर सिंग याने केले, तर आर्मी पब्लिक स्कुलचे प्रतिनिधित्व अनुष्का पन्नु हिने केले. सिम्बायोसिस इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या चिराग सिन्हा आणि द बिशप्स ज्युनिअर कॉलेज, कॅम्पच्या ध्वनी श्रोत्रीय यांनी उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा शाळा व महाविद्यालय या दोन प्रकारांत पार पडली. या स्पर्धेकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅझ्युमिंग कंट्रोल इन फ्युचर इस अ बून व अवर लाईफस्टाईल लिव्हज व्हेरी लिटिल रूम फॉर इंटर्नल अॅन्ड स्पिरिच्युअल ग्रोथ हे विषय होते.
या कार्यक्रमाला नरेंद्र गोडानी, डॉ.जॉन सॅमसन व कुणाल सरपाल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी अध्यक्ष डॉ.नितीन शाह होते. याप्रसंगी रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष पंकज आपटे,मयांक नायडू व नितेश अगरवाल उपस्थित होते. मोहित अगरवाल हे प्रोजेक्ट चेअरमन तर रोटेरियन हसीब फकीह यांनी सूत्रसंचालनाचे काम पाहिले. याप्रसंगी सुमलता बंटवाल, रोटेरियन प्रभाकर बंटवाल यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचे प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर वेंकटा रमणा दित्तकवी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.