वृत्तसंस्था । भारताने नेपाळच्या सीमेलगत लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. दरम्यान, भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. ‘नेपाळने कुणाच्यातरी सांगण्यावरुन हा आक्षेप घेतलाय’ असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे शुक्रवारी म्हणाले. मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये ते बोलत होते. यावेळी लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. त्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.
नेपाळच्या या आक्षेपामागे चीन असल्याचे संकेत त्यांनी दिले. “नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय कारण आपण रास्ता नदीच्या पश्चिमेकडे बांधला आहे. त्यामुळे ते आंदोलन कशासाठी करतायत ते समजत नाही आहे. यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीयत” असे नरवणे म्हणाले. मात्र, ‘नेपाळने कोणाच्यातरी सांगण्यावरुन आक्षेप घेतला असावा, ती शक्यता जास्त दिसतेय’ असे नरवणे यांनी म्हटलं.
राजनीतिक पाऊल उचलण्याचा नेपाळचा इशारा
लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळचे अविभाज्य अंग असून ते परत मिळवण्यासाठी राजनैतिक पावलं उचलू’ असा इशारा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी दिला आहे.संसदेत आपल्या सरकारची धोरण आणि कार्यक्रम मांडताना त्यांनी नवीन नकाशा जारी करुन लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू असं विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं आहे.
लिपूलेख पर्यंत जाणार हा रास्ता का आहे भारतासाठी महत्वाचा?
उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख असा हा ८० किलोमीटरचा मार्ग ८ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. मात्र याच रस्त्यावरून आता भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”