अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाणार ?? आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा खळबळजनक दावा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान आठवलेंच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. ‘परवा मुख्यमंत्री मला म्हणाले की, आठवलेजी आता तुम्ही इकडे या. पण मी म्हणालो तुम्हीच इकडे या,’ असं म्हणत आठवले यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकवला.

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, रामदाल आठवलेंनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment