महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकामुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक झाला असून आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

रामदास आठवले यांनी ट्विट करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मुकेश अंबानी मोठे उद्योगपती आहेत. लाखो लोकांना त्यांनी रोजगारही दिलाय. मुकेश अंबानींचं घर उडवण्यामागे सचिन वाझे तर आहेतच, पण त्याचबरोबर आणखी कोण कोण आहे, याची चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चाललीय. सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून झालंय. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळेच NIA कडे चौकशी गेलीय, असंही रामदास आठवले म्हणालेत.

महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घटना घडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आरपीआयकडून मी मागणी करतो की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावे, त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्रही पाठवत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे, असंही रामदास आठवलेंनी सांगितलंय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment