ऊर्जामंत्र्यांना आरपीआयचा इशारा : आंबेडकर जयंतीदिनी लाईट घालवू नये

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भारनियम करू नये. महापुरूषाच्या जयंतीदिवशी भारनियमन केल्यास ऊर्जामंत्री यांना फिरू दिले जाणार नाही. तसेच त्याचा पुतळा जाळण्यात येईल, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी सातारा येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालखंडामध्ये त्यांनी भारनियमनाचा घाट घातलेला आहे. दोन दिवसावर आंबेडकर जयंती आली असता, आजपासूनच दि. 12 एप्रिल पासून त्यांनी जो भारनियमनचा घाट घातलेला आहे. आठ तास लोडशेडिंग हा प्रकार अत्यंत चुकीचा व महापुरुषाच्या बद्दल द्वेष भावनेचा आहे. एकंदरच रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे, की 14 एप्रिल रोजी पहाटे 5 ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत भारनियमन ठेवू नये. जर महावितरण भारनियमन करणार असेल तर मग मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून आणि ऊर्जा मंत्र्याला साताऱ्यामध्ये फिरू देणार नाही.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी असून हा तमाम बहुजन वासी यांचा फार मोठा मोलाचा दिवस आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे कार्यकर्ते मनोरंजन, व्याख्याने तसेच प्रबोधन कार्यक्रम करत असतात. अशा कार्यक्रमांमध्ये मिरवणुका देखावे यासाठी विजेची गरज असते. जर विद्युत बंद असेल तर मात्र रिपब्लिकन पक्ष कदापी खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित ऊर्जा मंत्री तसेच अधिकाऱ्यांना सागणे आहे, लोकभावनेचा विचार करून वेळप्रसंगी एमआयडीसीमध्ये वीजेची कपात करावी. मात्र, 14 एप्रिल या दिवशी सर्वसामान्यांच्या आनंदामध्ये विरजन आणण्याचा प्रयत्न केला. तर बहुजन तरुण कदापि स्वस्त बसणार नाही.